धार्मिक स्थळ

mata_bhavani

माता भवानी मंदिर : -
 गावाच्या उत्तरेस डोंगराच्या कडेवर व बोरी नदीच्या किनारी माता भवानी मातेचे मंदिर आहे. हे मंदिर १५० ते २०० वर्षे जुने आहे. दसरा नवरात्रि या सणामध्ये सिंद्खेड, मोट्याळ, कुरनूर व बावकर वाडी या गावाचे भक्त  देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मंदीरा पासून आवघ्या ९०० मीटर आंतरावर कुरनूर धरण व थोड्या आंतरावर महादेवाचे मंदिर आहे.

श्री महादेव मंदिर: 
 श्री महादेवाचे मंदिर हे गावपासुन आवघ्या १.५ किलोमीटर आंतरावर आहे. कुरनूर धरणाच्या पश्चिमेस आगदी किनार्‍यावर महादेवाचे मंदिर आहे. बाजूला शांत वातावरण व आथांग पाणी पाहून मन आगदी प्रसन्न होते.

temple
none

मसजीद 
गावामध्ये मुस्लिम बांधवासाठी नमाज व इतर धार्मिक कार्यक्रमासाठी जसे मोहर्र्म, बकरी ईद, रमजाण  इत्यादि कार्यक्रमे या ठिकाणी पार पडली जातात. गावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणजे गावातील सर्व हिंदू मुस्लिम बांधव धार्मिक व संस्कृतिक कार्यक्रम एकत्र येऊन करतात.

मारुति मंदिर
गावातील मारुति मंदिर हे अत्यंत जुने असून गावातील सर्व  धार्मिक कार्यक्रम या मारुति मंदिरामध्ये होतात.जसे गोपाल काला (श्री कृष्ण जयंती), हनुमान जयंती, राम नवमी, भजन कीर्तन व ग्रंथ वाचन इत्यादी कार्यक्रम या मंदिरात केले जातात.

hanauman_mandir
dargah

बंदे नवाज दरगाह
गावातील मुस्लिम बांधवांचे श्रद्धा स्थान म्हणजे बंदे नवाज दरगाह. दरवर्षी गावातून देवाचा उरूस व जुलूस वाजत गाजत निगतो. या मध्ये गावातील सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन बंदे नवाज बाबा ची जत्रा भरवली जाते.

श्री महालक्ष्मी मंदिर
श्री महालक्ष्मी मंदिर हे गावातील एक देवस्थान आहे गावाच्या आगदी मधोमद हे मंदिर आहे.

mahalakshmi

हे पेज शेयर करा !

पत्ता

सिंद्खेड पो. मोट्याळ 
ता. अक्कलकोट जि सोलापूर
पिन: ४१ ३२ १६

संपर्क

ई-मेल: support@abcd.com
संपर्क: +९१ १२३४५६७८९
ग्रामपंचायत कार्या: +९१ १२३४५६७८९

Free Web Hosting