धार्मिक कार्यक्रम

 

none

मुहर्रम
 मुहर्रम हा इस्लामिक वर्ष म्हणजेच हिजरीचा पहिला महिना आहे. हा एक मुस्लिम उत्सव आहे. हिजरी या महिन्यापासून जन्माला येतात. इस्लामच्या चार पवित्र महिन्यांमध्ये हा महिना समाविष्ट आहे. अल्लाहचा संदेशवाहक, हजरत मुहम्मद याने या महिन्यात अल्लाहचा उल्लेख केला आहे. याव्यतिरिक्त, या महिन्यात रोझा ठेवण्याचे विशेष महत्त्व आहे

गणेश जयंती
  माघ महिन्यातील चतुर्थीला माघी चतुर्थी असे म्हटले जाते. हा गणपतीचा जन्म दिन होय. जागृती , स्वप्न , सुषुप्ती आणि तुरीय अशा चार अवस्था मानल्या गेल्या आहेत. चतुर्थी ही तुरीयावास्था म्हणजे आत्मिक साधनेची एक अवस्था मानली गेली आहे असे भारतीय तत्वज्ञान मानतेगणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात.

none
none

बंदे नवाज यात्रा मोहोत्सव
  बंदे नवाज यात्रा / उरूस गावातील मोठ्या जत्रापैकी एक यात्रा / उरूस आहे . या यात्रेमध्ये गावातील सर्व जाती धर्माचे महिला पुरुष लहान मुले व व्रद्ध सहभागी होतात. ही यात्रा / उरूस तीन दिवस चालते व शेवटच्या दिवशी कुस्त्याचा मोठा कार्यक्रम गावात केला जातो.शेजारील अनेक गावे व तेथील पैलवान यामध्ये सहभागी होतात.

नवरात्र मोहोत्सव
 नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.

none
none

गोपाळ काला (कृष्ण जयंती) 
 जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे

रमजाण
 इस्लामी कालगणनेनुसार येणारा ९ वा महिना हा रमझानचा महिना.मुस्लीम धर्मियांसाठी विशेष महत्त्व दर्शवितो.या महिन्यात इस्लामचे श्रद्धावंत सूर्योदय ते सूर्यास्त कडक उपवास करतात.रमझान शब्दाची व्युत्पत्ती म्हणजे तो (ramz)रमझ या पासून तयार झाला,रमझ चा अर्थ आहे 'जाळणे'.उन्हाळ्याच्या ऋतूमधील महिना अथवा या महिन्यातील उपासामुळे व्यक्तीची पापे जाळली जातात म्हणून याचे नाव रमझान.मुस्लिमांच्या धर्मातील ५ आधारस्तंभातील हा एक आधारस्तंभ आहे.या महिन्याचे महत्त्व मुहम्मद पैगंबरांनी विषद केले आहे

none
none

श्रावण मास ग्रंथ 
श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. श ्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैन धर्मियांची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे

हे पेज शेयर करा !

पत्ता

सिंद्खेड पो. मोट्याळ 
ता. अक्कलकोट जि सोलापूर
पिन: ४१ ३२ १६

संपर्क

ई-मेल: support@abcd.com
संपर्क: +९१ १२३४५६७८९
ग्रामपंचायत कार्या: +९१ १२३४५६७८९

Free Web Hosting